न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेच्या (पी. जी. इन्स्टिट्यूट) अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांची पालिका आस्थपनेवर खुल्या वर्गात कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.२८) दिले आहेत.
डॉ . वाबळे यांची मानधनावर २ वर्षांसाठी अधिष्ठातापदी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची या पदावर कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूच्या पदांसाठी पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केली होती.
उमेदवारांची मुलाखत घेतली. त्यात डॉ. वाबळे यांची निवड झाली. निवडीस विधी समितीने १२ जूनला तर, सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्टला मंजुरी दिली आहे. त्या प्रस्तावाला आयुक्तांनी २५ सप्टेंबरला मान्यता दिली. त्यामुळे डॉ. वाबळे हे आता कायमस्वरूपी अधिष्ठाता झाले आहेत.


















