न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्व ८ क्षेत्रीय समिती अध्यक्षांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. ३०) तीन दिवस अर्जवाटप केले जाणार आहे. सोमवारी (दि. ५) अर्ज स्वीकारले जाणार असून, शुक्रवारी (दि. ९) निवडणूक होणार आहे.
उमेदवारी अर्जाचे वाटप बुधवार (दि. ३०) व गुरुवारी (दि. १) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आणि सोमवारी (दि. ५) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत संबंधित क्षेत्रीय कार्यालयात केले जाणार आहे. उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. ५) दुपारी ३ ते सायंकाळी ५ असे केवळ २ तासांच्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत.


















