न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०१ डिसें.) :- भोसरीतील अण्णासाहेब मगर बँकेचा १९ वा वर्धापनदिन उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी आयोजित तिर्थप्रसादास बँकेचे सभासद, ठेवीदार, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार महेश लांडगे यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, बँकेची प्रगती निश्चितच स्वागताहार्य आहे. तसेच बँकेचा चढता आलेख पाहून कामगीरीचे कौतुक केले. त्याचप्रमाणे सभासदांचा बँकेप्रती असलेला विश्वासच बँकेच्या प्रगतीचा मार्ग आहे. हाच विश्वास सार्थ ठरवत अण्णासाहेब मगर सहकारी बँकेने केलेली प्रगती निश्चित कौतुकास्पद आहे, असे मत आमदार लांडगे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, माजी नगरसेवक शंकरराव पांढरकर, नगरसेवक नितीन लांडगे, सागर गवळी, गोपीकृष्ण धावडे, संतोष गवारे, निलेश पांढारकर, पांडूरंग गवळी, पोपटराव फुगे, राहूल गवळी, सदाशिव बोर्हाडे, उद्योजक सुभाष शिंदे, विलास खांदवे, अनिल दोडके, सुनिल हुळावळे, भाऊसाहेब लांडे, शामराव लांडगे, बाळासाहेब लांडे, रोहिदासलांडे, दत्तोबा लांडे, हभप राजाराम फुगे, देविदास फुगे, शशिकांत घुले, आनंदा यादव आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध मान्यवरांनी बँकेच्या प्रगतीविषयी गौरवउद्गार काढले. तसेच बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर, संचालक सर्वश्री अॅड. घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, विजय गवारे, राजेश सस्ते, सविता मोहरुत, सोनल लांडगे, मनोज बोरसे, शंकर मेटकरी, दिपक डोळस, अॅड. बाळासाहेब थोपटे, सी. ए. अमेय दर्वे, व मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.















