न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ०१ डिसें.) :- नगरसेवक राजेंद्र लांडगे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. राज्यभर दुष्काळाचे सावट असताना वाढदिवसाचा खर्च टाळून लांडगे यांनी दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील “स्नेहवन” आश्रम या सामाजातील वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थेतील अनाथ व निराधार मुलांना खाऊचे वाटप तसेच आश्रमामध्ये अन्नधान्य वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक राजेंद्र लांडगे, आश्रमातील व्यवस्थापक, मुले व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.










