न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२०) :- रिक्षा चालकांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिना दहा हजार मिळावे, शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करावे त्यांची आर सी बुक कोरे करावे, मुक्त रिक्षा परवाना बंद करावा, ओला उबेर वर निर्बंध आणावेत, रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वतीने हप्ते वसुलीसाठी रिक्षा चालकांना त्रास दिला जात आहे, याबाबत सक्त वसुली आणि गुंडागर्दी दादागिरी करू नये असे आदेश सरकारने संबंधित सर्व फायनान्स आणि बँकांना द्यावेत, रिक्षा चालक मालकांसाठी घरकुल योजना राबवावी, रिक्षा चालक मालकांसाठी covid-19 च्या काळात ५० लाखाचा विमा मिळावा, यासह इतर विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांचे नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी ११.०० वाजता पिंपरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने लक्ष न दिल्यामुळे आणि रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवल्यामुळे रिक्षा चालकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सावळे कुणाल वावळकर यांनी उपस्थित राहुन पाठींबा दिला आणि मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब सोनवणे, इजाज शेख, बाळासाहेब ढवळे, वकील शेख, दत्तू सरकते, आदी उपस्थित होते.
बाबा कांबळे म्हणाले सरकारने एस टी बस ला तसेच मुंबईमध्ये बेस्ट आधी पुण्यात पीएमसी वाहतुकीस परवानगी दिली परंतु रिक्षा व्यवसायात मात्र अनेक बंद घालण्यात आली आहेत, आज रोजी ७० टक्के रिक्षा बंद आहेत. गेली सहा महिन्यापासून बंद असलेल्या रिक्षा सेवा तात्काळ सुरू करावी रिक्षाचालकांच्या इतरही मागण्या सोडवाव्यात अन्यथा अभिनय कायदेभंग रिक्षाचालक आपले रिक्षा सुरू करतील तोपर्यंत बोंबाबोंब आंदोलन सुरूच राहणार आहेत असे बाबा कांबळे म्हणाले.
बाळासाहेब भागवत म्हणाले रिक्षाचालक हातावरच पोट असणारा घटक असून त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आम्ही नुकतीच रामदासजी आठवले यांची भेट घेतली त्यांनीदेखील या आंदोलनास पाठिंबा दिला होता रिक्षावाल्यानं सोबत आम्ही ठामपणे उभे आहोत सरकारने त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत असे सांगितले.
सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजय अवतारे यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण १२० रिक्षा स्टँडवरती हे आंदोलन करण्यात आले.















