न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनावरील भेसळ केलेल्या इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी दिल्लीतील एका केमिस्टला मंगळवारी वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अजय शामलालनासा (४०) असे या केमिस्टचे नाव असून त्याच्याकडून भेसळ केलेल्या पंधराहून अधिक इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे.
प्रत्येक इंजेक्शनसाठी तो एक लाख रुपये घेत होता. महाराष्ट्रात दाखल झालेला इंजेक्शन भेसळीचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
अजय हा मूळचा दिल्लीचा रहिवाशी असून त्याचे स्वत:चे केमिस्ट दुकान आहे. जप्त केलेले इंजेक्शन स्वित्झर्लंड कंपनीकडून आयात केले जात असून रोश प्रोडेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून त्याची विक्री केली जाते असे तपासात निष्पन्न झाले.















