न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड शहरात अनेक दिव्यांग व्यक्ती व विद्यार्थी कामानिमित्त व शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्यांच्यासाठी पीएमपीएमएलच्या बस प्रवासाठी मोफत पासची सुविधा देण्यात येते. मात्र, यासाठी लावण्यात येणाऱ्या अटी शिथिल करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र दृष्टीहिन कल्याण संघाच्यावतीने करण्यात आली आहे.
पीएमपीएमएल प्रशासनाने या व्यक्तींसाठी मोफत प्रवासी पासची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यासाठी संबंधित प्रवासी हा पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असावा, यासाठी त्याचे आधारकार्ड व रेशनिंग कार्ड देण्याची अट ठेवण्यात आली आहे. अनेक दिव्यांग व्यक्तींकडे स्थानिक रहिवासी पुरावा नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. याबाबत नियम शिथिल करण्यात यावेत, याबाबत संतोष राऊत यांनी पत्र दिले आहे.


















