न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. ०१ डिसें.) :- शिवसेनेचे विधानसभेतील धडाडीचे वक्ते आणि टोलेजंग नेत्यांची खाण असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व करणारे आमदार विजय औटी यांची विधानसभेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली आहे.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्यावतीने विभागप्रमुख विशाल यादव यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.















