न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगवी परिसरात महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहीम उपक्रमात सहभाग घेतला व महापौर यांनी नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले.
उपक्रमात नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी रमेश भोसले उपस्थित होते.


















