न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ ऑगस्ट रोजी दुपारी आदर्शनगर, दिघी येथे घडला. याबाबत १ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू भास्कर लहाने (वय २५, रा. दिघी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २९ ऑगस्टरोजी दुपारी आरोपी राजू आणि त्याचे वडील भास्कर लहाने यांचे जोरजोरात भांडण सुरु होते.
आरोपी आणि फिर्यादी समोरासमोर राहतात. त्यामुळे राजू याची आई आणि बहीण यांनी भांडण सोडविण्याच्या मदतीसाठी फिर्यादी महिलेला बोलावले. फिर्यादी महिला त्यांच्या गॅलरीत आल्या असता राजू याने त्यांना विनाकारण अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली.















