- आज ५९८ जणांना कोरोनाची बाधा तर, २२ जणांचा मृत्यु; ८१६ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. ०३ ऑक्टोबर) रोजी ५९८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ८१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले आठ पुरुष रुग्ण हे चिंचवड (४३ वर्षे, ६७ वर्षे, ५१ वर्षे), चऱ्होली (६७ वर्षे), प्राधिकरण (३७ वर्षे), थेरगाव (५४ वर्षे), चिखली (६७ वर्षे), मोशी (५८ वर्षे), शहरातील मयत तीन स्त्रिया चिंचवड (६२ वर्षे, २५ वर्षे), भोसरी (४५ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले सात पुरुष रुग्ण देहुगाव (६६ वर्षे, ६० वर्ष), आंबेगाव (६२ वर्ष), कात्रज (६१ वर्षे), अलिबाग (५३ वर्षे), कामशेत (७५ वर्षे), भिगवण (४२ वर्षे), शहराबाहेरील मयत चार स्त्रिया चाकण (६२ वर्षे), नांदेडगाव (८७ वर्षे), तळेगाव दाभाडे (५२ वर्षे), मगरपट्टा (५४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे २०६५२३८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये १७३३ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ३९९ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ७९९३६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७२९८० वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १३४८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.


















