न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला पळवून नेले. पीडित मुलीचे कुटुंब बीड जिल्ह्यातील असून तिच्या वडिलांच्या कामानिमित्त हे कुटुंब भोसरी येथे वास्तव्यास आहे.
खासगी कंपनीत वाहनचालक असलेल्या वडील, आई तसेच लहान दोन भावंडे असलेल्या पीडित मुलीला दूरच्या नात्यातील एका तरुणाने फूस लावून पळवून नेले. याबाबत तिच्या आईवडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी मुलीला बाहेरगावी पाठविण्यात आले. तेथे जाऊन आरोपीने मुलीला पुन्हा पळवून नेले. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
तसेच मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. तुरुंगातून सुटून आल्यानंतर आरोपीने पुन्हा मुलीला पळवून नेले. तक्रार मागे घेण्यास सांगून आरोपीच्या नातेवाईकांनी धमकावल्याप्रकरणी पुन्हा पालकांनी तक्रार केली. त्यानुसार नातेवाईकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.