न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- पीएमपीएमएल बस ही चालकाने भरधाव वेगात चालवुन पायी रस्ता क्रॉस करणाऱ्या वय ६५ वर्षीय वृद्धाला समोरून धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युस आरोपी वाहन चालक कारणीभत झालेला आहे.
हा प्रकार (दि. १८) रोजी सकाळी ०८.२५ वाजताचे सुमारास लोंढे वस्ती, गल्ली नं.०२ समोरील डांगे चौकाकडुन ताथवडे गांवकडे जाणारे बीआरटी बस रस्त्यावर, ताथवडे येथे घडला. रफीक मोहम्मद हनीफ (सिध्दीकी) (वय-५२ वर्षे) यांनी आरोपी पीएमपीएमएल बस (नंबर एम.एच.१२ टी.व्ही.०३३१) वरील चालक शेखर बाबासाहेब हाजगुडे (वय-३२ वर्षे, रा. आदर्शनगर, मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ६२३/२०२४ भा.द.वि. कलम २७९,३०४ (अ) मोटार वाहन कायदा कलम १८४,११९/११७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि नलावडे पुढील तपास करीत आहेत.












