न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- चिंचवडगावात रविवारी (दि. १९) रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे होर्डिंगच्या जाहिरातीचा प्लास्टिकचा ‘कव्हर’ कोसळला आहे.

येथील लिंक रस्त्यावरील एल्प्रोच्या जागेत असणाऱ्या या होर्डिंगच्या प्लास्टिकचा ‘कव्हर’ ‘हेरीटेज प्लाजा’ या इमारतीच्या आवारात कोसळला आहे.
दरम्यान या होर्डींग्जच्या सांगाड्याचा काही भाग धोकादायक अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा मोठ्या रहदारीचा भाग असल्यामुळे महापालिकेने होर्डींग्जची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.











