न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलेंडर टाक्यातून काढून विक्री करण्याच्या उद्देशाने छोटया ४ किलो वजनाच्या लोखंडी सिलेंडर टाक्यामध्ये गॅस रिफिलिंग सर्किटच्या साहाय्याने धोकादायक रित्या, कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता, लोकांच्या जीवीतास धोका निर्माण होईल, अशी कृती करीत गॅस ट्रान्सफर केला. गॅसच्या भरलेल्या टाक्या चढ्या दरात स्वतःच्या आर्थिक फायदयाकरता विक्री केली.
दरम्यान अवैधरित्या गॅस टाक्या, गॅस वाहतुक करण्यासाठी लागणारा टेम्पो व गॅस ट्रान्सफर करण्यास लागणारे साहीत्य असा एकूण ८,२०,००० रु. किंमतीचा अवैध गॅस साठा व साहीत्य खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (दि. १८) रोजी दुपारी १.०० च्या सुमारास राधाकृष्ण स्विटच्या मागे, गणेश नेवाळे यांचे शेतात, नेवाळे वस्ती, चिखली येथे कारवाई करून जप्त केले आहे.
आरोपी १) सागर रमेश वाघमारे (वय २५ वर्षे धंदा गॅस विक्री, रा. मोरेवस्ती अंगणवाडी सोसायटी, रु.न. ०१, चिखली), २) प्रशांत दौंडकर यांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात २९३/२०२४ भा.दं.वि कलम २८५,२८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र. १ याला अटक केली आहे. पोउपनि देवकर पुढील तपास करीत आहेत.















