न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३९ च्या झोन २ च्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना ‘व्होकेशनल एकालन्स सर्व्हिस ॲवार्ड’ प्रदान करण्यात आला.
लुंकड यांनी नाशिक येथील सामनगाव येथे मातोश्री वृद्धाश्रमास स्वखर्चाने एका इमारतीचे बांधकाम केले असून मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाला स्वखचनि एक इमारत बांधून देत आहेत. त्यांना जैन समाजाचा अति प्रतिष्ठित पुरस्कार, समाजरत्न, चिंतामणी शामीठाचा गुरुजन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. या कार्यासाठी त्यांना रोटरीने दिलेला हा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.
रावेत येथे झालेल्या या कार्यक्रमात रोटरी निगडी क्लबच्या वतीने फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण भागवत यांना देखील व्यावसायिक नैपुण्य सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. रोटरीच्या प्रांतपाल मंजू फडके, संचालक वसंत मालुंजकर, हिरामण बोत्रे, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हरविंदरसिंग दूत, सहाय्यक प्रांताल मेहुल परमार, विजय काळभोर, आरकेएलचे संचालक रविंद्र लुंकड, गणेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता राजापूरकर तर आभार हरदिर सिंग यांनी मानले.












