- कठोर कारवाईची आपची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने 19/05/2024 रोजी रात्री 02:30 वा. बाॅलर हाॅटेलमध्ये पार्टी करून घरी जात असताना कल्याणीनगर पुणे येथील लॅन्डमार्क सोसायटी जवळ पोर्शे कारने भरधाव वेगाने चालवून पल्सर गाडीला धडक दिल्याने त्या गाडीवर असणाऱ्या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
कारचालक वेदांत अगरवाल याचेवर गु.र.नं.व कलम -306/2024 भादवि कलम 279,304(अ) ,337,338,427.मोटार वाहन अधिनियम कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या व्यक्तीचा आज दुपारी जामीन मंजूर देखिल झाला. परंतु वेदांत अगरवाल ही व्यक्ती 17 वर्षाची आहे तर मोटार वाहन कायदा 2019 प्रमाणे *मोटार वाहन कायदा कलम 199अ* नुसार पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.
नुकतीच 12 वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party गेला होता. जाताना वडिलांची (विशाल अगरवाल) आलीशान कार घेऊन तो मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट मध्ये गेला. शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी Cosie रेस्टॉरंट मध्ये दारुची पार्टी केली. त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठराविक मित्र Marriott suits मधील Black नावाच्या पब्स मध्ये गेले. वेदांत अगरवाल याने आणखी कोणत्या अमली पदार्थांचे सेवन केले होते का ? त्याची नार्को टेस्ट करण्यात आली का? दोन जणांचा जीव गेल्यानंतरही FIR मध्ये जामीन लवकर होईल असे कलमे का दाखल करण्यात आले? पुणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शनिवारी रात्री उशिरापर्यंत पब्स पुन्हा सुरु असल्याचे दिसून आले.
मुंढव्यातील Cosie restaurant आणि Marriott suits मध्ये अल्पवयीन मुलांना दारू विक्री केली जात असूनही कारवाई का झाली नाही? येथिल CCTV footage तपासले तर भयानक चित्र समोर दिसेल. वेदांत अगरवाल प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. रात्री उशिरापर्यंत पब्स चालू ठेवणाऱ्या पब्स मालकांवर देखिल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी पुणे पोलिस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.











