न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- दुचाकी पुढे नेताना झालेल्या वादातून रिक्षाचालकाने दुचाकीस्वार निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेतला. रिक्षाचालकाने जोरात चावा घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा भाग तुटून पडला. रविवार पेठेत ही घटना घडली.
याप्रकरणी रिक्षा चालक गणेश सोमनाथ भुसावळकर (वय ६०, रा. हेरंब काशीनाथ सोसायटी, धनकवडी, बालाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्ञानेश्वर खंडू बेंद्रे (वय ६६, रा. अयोध्यानगरी, प्रगतीनगर, बोपोडी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्ञानेश्वर बेंद्रे पोलीस दलातून निवृत्त झाले आहे. ते रविवार पेठेतून पत्नीसह दुचाकीवरुन निघाले होते. रविवार पेठेत गृहोपयोगी साहित्य खरेदीसाठी आले होते.












