- तलाठ्यासह कंपनीची मोठी फसवणूक; दिघी पोलिसांकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२४) :- नोदणीकृत मूळ दस्त क्रमांकामध्ये स्वतःच्या फायद्याकरिता अफरातफर केली. स. नं.ची बेकायदेशीरपणे नोंद करून बनावट दस्त गाव कामगार तलाठी, दिघी यांच्या कार्यालयात सादर करून त्याद्वारे फिर्यादीची कंपनी डायनॅमिक लॉजिस्टिकस प्रा. लि. आणि शासनाची फसवणूक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १२ /०५/२०२३) दरम्यान दिघी येथील सर्व्हे नं. ७९ येथील १२ हेक्टर १४ आर मिळकतीवर घडला. फिर्यादी रोशन प्रफुल तालेरा (वय ३५ वर्षे) यांनी आरोपी १. उर्मिला महादेव कळमकर (रा. आळंदी रोड, शास्त्री चौक, भोसरी), २. प्रदिप प्रल्हाद बावीस्कर (रा. दिघी) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
दिघी पोलीसांनी ठाण्यात २३६/२०२४ भा.दं.वि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उप निरीक्षक ए. एम. शिंगारे तपास करीत आहेत.












