- सरसकट शुल्कास हॉटेल व्यावसायिकांचा विरोध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारच्या उलाढालीच्या प्रमाणामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे परवाना शुल्क आकारले जाते. कोट्यवधींची आणि लाख रुपयांची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनासुद्धा एकच शुल्क आकारले जाऊ नये, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून होत आहे.
कोरोनामुळे ( कोविड १९ ) पुकारलेल्या टाळेबंदीनंतर सहा महिन्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारचे दरवाजे सोमवारी (दि. ५ ) उघडले. मात्र, ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, त्याबाबत व्यावसायिकांमध्ये साशंकता दिसून येत आहे.
हॉटेल उद्योगासाठी ही अडचणीची स्थिती लक्षात घेऊन सरसकट परवाना शुल्क न घेता उलाढालीवर शुल्क आकारण्यास सुरुवात करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून केली जात आहे.


















