न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (देि. ०६ ऑक्टोबर २०२०) :- जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी एक लाख ३३ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार मालक तसेच इतर २३ जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल केला. सावकार चौक, मारुंजी पाण्याच्या टाकी जवळ, हिंजवडी येथे पत्राशेडमध्ये हा जुगार सुरू होता.
अविनाश बुचडे (वय २७) असे जुगार अड्डा चालक व मालकाचे नाव आहे. त्याच्यासह इतर २३ जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सावकार चौक, मारुंजी पाण्याच्या टाकीजवळ, हिंजवडी येथे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. ४) तेथे छापा टाकला.















