- गुरुवारी ५६१ जणांना कोरोनाची बाधा तर, १४ जणांचा मृत्यु; ७१३ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. ०८ ऑक्टोबर) रोजी ५६१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ७१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – चिंचवडगांव ( ६६ वर्षे ), काळेवाडी ( ६६ वर्षे ), निगडी, पिंपळे सौदागर (६३ वर्षे), वाकड (८९ वर्षे), दिघी (७२ वर्षे), पिंपळे गुरव (६७ वर्षे), ०२ स्त्री – चिंचवड (६४ वर्षे), पिंपरी (४३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०३ पुरुष – सातारा (७३ वर्षे), कुरकुंडी (४५ वर्षे), खेड (५४ वर्षे), ०२ स्त्री – पुणे ( ५२ वर्षे ), पंढरपूर ( ६९ वर्षे ) येथील रहिवासी आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१४ पथकाव्दारे २२६०९४६ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये २३४२ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ५६२ व्यक्ती कोविड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८२५०३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७६७६३ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १४०५ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.















