न्युज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. ४ डिसें.) :- रावेत येथील एस. बी. पाटिल ज्यु. कॉलेजमधील बारावी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या यश वाल्हेकर या विद्यार्थ्याने अहमदनगर येथे झालेल्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ६५ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगीरी करुन सुवर्ण पदक पटकाविले तर अकरावीतील प्रणिता मुळे हिने ४५ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला.
दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पदमा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, भाईजान काझी, गिरीष देसाई, प्राचार्य अनुजा कामठे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना कॉलेजचे क्रिड़ाशिक्षक प्रदीप कासार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.