न्युज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. ४ डिसें.) :- निगडी येथील न्यू पुणे पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला व रंगभरण स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, न्यू पुणे पब्लिक स्कूलचे सचिव प्रदीप खंदारे, मुख्याध्यापिका चैताली पाठक, मोना होतचंदानी, रुषा भोसले, लतीफ मणेर आदी उपस्थित होते. सुमारे एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेच्या ३-६ या वयोगटात एन आर मनवी, ओम ओव्हाळ, सात्विक डेरे, दिवज्योत सिंग यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पाचवा क्रमांक पटकावला. या विजेत्यांना इलेक्ट्रिक मोटार सायकल, स्कुटर सायकल,स्कूल बॅग आणि कलर बॉक्स, टिफिन बॉक्स आणि स्केचपेन बॉक्स, कलर बॉक्स स्केच पेन बॉक्स देण्यात आले.
७- १० या वयोगटातील विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे :- त्रिशान मोंडल, ऋचा घडलिंग, प्रयोशी गावंडे, त्रिशान दास, राकेश दास यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवे क्रमांक मिळविले. या विजेत्यांना मिनी टॅब,सायकल, स्कूल बॅग आणि कलर बॉक्स, टिफिन बॉक्स आणि स्केचपेन बॉक्स, कलर बॉक्स स्केच पेन बॉक्स देण्यात आले.
सूत्रसंचालन माधवी अवधानी, रिज्वाना पटेल, सोनल सोनी यांनी केले तर आभार शताब्दी कोंडू यांनी मानले.