- फ्लॅटचे बुकिंग घेतल्यानंतर कामबंद ठेवून घातला नऊ लाखांना गंडा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- फ्लॅटचे बुकिंग घेतल्यानंतर कामबंद ठेवून एका पोलिसाची नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बिल्डरसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार द प्रिस्टिन हॉरीझन प्रमोटर्स अँड बिल्डर्सच्या हिंजवडी येथील ऑफिसमध्ये घडला.
बांधकाम व्यावसायिक प्रतिक ओमप्रकाश अग्रवाल (रा. बाणेर, पाषाण रोड, पुणे), विनय बोरवेकर (रा. हिंजवडी), किरण कुंभारकर (रा. हिंजवडी), अजिंक्य (पूर्ण नाव माहिती नाही, रा. हिंजवडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी गणेश बाबू गिरीगोसावी (३३, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपींनी प्रतिशिर्डी शिरगाव येथे मंदिराच्या बाजूला असलेल्या बांधकाम साईटची फिर्यादी गिरी गोसावी यांना माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करून फ्लॅट बुक करायला सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले. त्यानंतर बांधकाम साईटचे काम बंद ठेवले. फिर्यादी बुकिंग रद्द करण्यास गेले असता त्यांना वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन पैसे परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे.















