- स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांची आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- शहरातील सर्वसामान्य नॉनकोविड रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळावी म्हणून पालिकेने विधानसभानिहाय ३ रुग्णालये तत्काळ सुरू करावीत. तेथे चांगले डॉक्टर नियुक्त करावेत, अशी सूचना स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनी केली.
तसेच, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घेत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पूर्वीप्रमाणे नॉन नॉनकोविड रुग्णांवरही उपचार सुरू केले जावेत, अशी सूचना त्यांनी केली.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, वायसीएमच्या दोन मजल्यावर नॉनकोविड रुग्णांसाठी उपचार सुविधा सुरू करण्याचे नियोजन केले जात आहेत. त्यामुळे नॉनकोविड रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच, विधानसभानिहाय नॉनकोविड रुग्णालय सुरू करण्याबाबत उपलब्ध रुग्णालयांची पाहणी करून निर्णय घेतला जाईल. वायसीएममध्ये नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरू केल्यास डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत केलेला करार रद्द केला जाईल, असे लोंढे यांनी स्पष्ट केले.















