न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ४ डिसें.) :- चिखली-कुदळवाडीतील विद्युत डिपीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता. गेल्या अनेक दिवसांपासून स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या माध्यमातून एम. एस. ई. बी. प्रशासनाकडे ही विद्युत डीपी हटवण्यासाठी पाठपुरावा चालू होता.
आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांच्या प्रयत्नास यश आले असून, प्रशासनाकडून सोमवार (दि. ३) रोजी हरगुडे वस्ती येथील रहदारीस अडथळा ठरणारी विद्युत डीपी रस्त्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात आली आहे. विद्युत अधिकारी विक्रांत वरुडे व विद्युत कर्मचारी यांनी विद्युत डीपी हटवण्यासाठी सहकार्य केले असल्याचे यादव यांनी सांगितले.












