न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- नवी सांगवीत विधवा महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनी विनायक बोरोले (रा. फ्लॅट नं. ३, स्वामी विवेकानंद सोसायटी, नवी सांगवी, पुणे २७) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी सागर पाटील, किरण पाटील, आत्माराम पाटील, केवल पाटील (सर्व रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, नवी सांगवी, पुणे २७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी सांगवीत स्वामी विवेकानंद सोसायटी आवारात शुक्रवारी (दि. ९) रोजी सकाळी सात वाजता वरील चार आरोपींनी फिर्यादी महिलेस कोणतेही कारण नसताना शिवीगाळ केली. याबाबत फिर्यादी यांनी वरील चार आरोपींच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















