न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरीतील भाटनगर लिंकरोडच्या मैला शुद्धीकरण केंद्रातील टाकीत तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. स्थानिकांनी मैला शुद्धीकरण केंद्राकडे धाव घेत तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्याचा बुडून मृत्यू झाला.
बाहेरच्या व्यक्तीला मैला शुद्धीकरण केंद्रात प्रवेश नसतो. मात्र मयत तरूण हा तिथे रात्रपाळीत वॉचमनचे काम करीत होता. काही कामासाठी आला असेल म्हणून त्याला प्रवेश दिल्या गेला आणि त्यानं असं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी दिली.
रवी जानराव असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. घरगुती वादातून तरुणाने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.















