- पदाधिकारी नियुक्ती व कार्यकर्त्यांचा घडविला राष्ट्रवादीत प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका येत्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल शंकरराव वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची आढाव बैठक घेण्यात आली.
यावेळी रविकांत वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तसेच पंडित गौतम आगा, सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहराचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा युवकच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर व प्रदेश सरचिटणीस संदीप (लाला) चिंचवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध विषयांवर चर्चा व आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेत युवकांना मार्गदर्शन करण्यात आले आणि नवपदनियुक्ती करण्यात आली.
यात विपुल विलास तापकीर, उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर, संदीप दत्तू धाइंजे चिंचवड विधानसभा सरचिटणीस, प्रकाश गुलाब म्हस्के चिंचवड विधानसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी हेमंत बालघरे, ओंकार शिंदे, करण चव्हाण, शुभम दुसिया, अजहर शेख या युवकांनी शहर राष्ट्रवादी युवक कॉग्रसमध्ये प्रवेश केला. यावेळी शहरातील सर्व युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विशाल शंकरराव वाकडकर यांनी दिली.


















