न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२०) :- करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अशातच राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाणार आहे. राज्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.
करोनावर अद्यापही लस आलेली नसल्यामुळे आता आपल्याला करोनासोबत राहावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के झाले आहे.


















