न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. ऑक्टोबर २०२०) :- महापालिकेच्या वतीने शहरात राबविण्यात येत असलेल्या माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ या मोहिमेचा दुसरा टप्पा बुधवारपासून (दि. १४) राबविण्यात येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात ८ लाख १० हजार घरांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.
दुसरा टप्पा २४ ऑक्टोंबरपर्यंत राबविला जाणार आहे. मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने गुगल मीट आणि वेबिनारद्वारे पिंपरी – चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन, ज्येष्ठ नागरिक संघ, वाकडमधील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत महापालिका वैद्यकिय विभागाकडून ऑनलाइन चर्चा करण्यात आली.


















