न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२०) :- गुन्हे शाखेचे कर्मचारी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी नितीन खेसे यांना शिवशक्ती कॉलनी, भोसरी येथे एकजण झाडाच्या कडेला एकजण दोन पोत्यांसह संशयितरित्या उभा असलेला दिसून आला.
यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडील दोन पोत्यांमध्ये ३७ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचे दिसून आले. या गांजांची किंमत नऊ लाख ३७ हजार ७१० रुपये इतकी आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली.
त्याने हा गांजा विक्रीसाठी आणला असल्याची कबुली पोलिसांना दिली. दत्ता पुरूषोत्तम कल्याणी (वय २५, रा. लांडगेवस्ती, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


















