- रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरण व अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- प्रभाग क्रमांक ०२ मधील जाधववडी, चिखली, कुदळवडी, बालघरे वस्ती राजेशिवाजी नगर, पंतनगर भागातील सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रेटीकरण होणार असल्याची माहिती माजी महापौर राहूल जाधव यांनी दिली.
आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच सहकार्याने प्रभाग क्रमांक ०२ जाधववाडीची सेक्टर १६ कुदळवाडी, बालघरे वस्तीमध्ये रोकडे वस्ती, महादेवनगर, लोंढे वस्ती, पंतनगर व पूर्ण जाधववाडी भागातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करणार असा शब्द महापौर झाल्यानंतर जनतेला दिला होता. महापौर झाल्यानंतर आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या सहकार्याने प्रभागतील विकास कामासाठी भरपूर निधी मंजूर करून घेतला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली.
चिखली गावठाण भागातील बरेचसे रस्ते काँक्रिटीकरण काम पूर्णत्वाकडे आहे. तसेच उर्वरित पंतनगर, सेक्टर १६ राजेशिवाजीनगर, बालघरेवस्ती आणि संपूर्ण जाधववडी मधील सर्व रस्त्यांचे येत्या काही दिवसात काँक्रिटीकरण केले जाईल, अशी माहिती माजी महापौर राहुलदादा जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राहुलदादा यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत जाधववाडी परिसरातील काँक्रिटीकरण व अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन कामाची पाहणी केली. लवकरच अमृत योजनेतून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चालू करण्याच्या सूचना राहुल जाधव यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.