- डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात होऊ शकते राष्ट्रपती राजवट – प्रकाश आंबेडकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( १२ ऑक्टोबर २०२०) :- केंद्राने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारने अद्याप मंदिरे सुरू केली नाहीत. केंद्राची भूमिका राज्य सरकारविरोधी असल्याचं सांगत, डिसेंबरपूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.
सध्या देशात बिहार विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणूक प्रक्रियेकडे आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात बिहारमधील निवडणुकांनंतर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलंय.
राज्यघटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जात येत नाही. पण, महाविकास आघाडी सरकार केंद्रविरोधी भूमिका घेत असल्याचे सांगत आंबेडकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.


















