- खर्च कोणी करायचा आढावा बैठकीत चर्चा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२०) :- पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनेसाठी एकुण दोन हजार ५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च महापालिका स्वतः करणार की, राज्य केंद्र शासनाच्या मदतीने करायचे हे अद्यापि निश्चित झालेले नाही. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. नदी सुधार कामांच्या संदर्भात आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली.
महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, माजी उपमहापौर राहुल जाधव, नगरसेवक तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर, सहशहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, शहरातील पर्यावरण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
नदीसुधार योजनेतील आतापर्यंत झालेल्या कामांचे सादरीकरण सुधारण्याचा खर्च अधिक असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. राज्य व केंद्राकडून निधीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम अहमदनगरच्या एचसीपी डिजाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रा. लि. करीत आहे.


















