न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाने आज बुधवार (दि. ५) रोजी कारवाई केली.
पिंपरी कॅम्पमधील साई चौक ते गेलॉर्ड चौकाकडे जाणा-या रस्त्यावरील दुकानाच्या बाहेर फुटपाथवर तयार केलेल्या पाय-या, ओटे यांनी जागा अतिक्रमित केलेली आहे. त्यामुळे वाहतुकीला व नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. महापालिकेने बुधवार (दि. ५) रोजी जेसीबीच्या सहाय्याने हे अतिक्रमण हटविले आहे.
यावेळी दुकानाच्या शटरला लावलेल्या जाळ्या गॅस कटरने कापून जप्त करण्यात आल्या. त्याचबरोबर दोन विनापरवाना हातगड्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या हातगाड्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्डेडियम येथे जमा करण्यात आल्या आहेत.












