न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०५ डिसें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग क्षेत्रीय’ कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २७ राहटणी श्रीनगर परिसरातील रहटणी लिंक रोड परिसरात महिलांकरीता स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी प्रशासन अधिकारी झगडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या परिसरात शाळा, कॉलेज व कामानिमित्त जाणाऱ्या महीला व शाळेतील विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. तसेच हा परिसर वर्दळीचा असल्यामुळे महीलांची लघुशंकेसाठी मोठी कुचंबना होत आहे. या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने येत्या पंधरा दिवसांच्या आत या परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह उभारावे. अन्यथा, शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारीसंघ यांच्यावतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा दाखले यांनी दिला आहे.












