न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते किसन बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या मजबुतीसाठी नुकतीच पिंपरी-चिंचवड शहर नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी किसन बावकर यांना संधी देण्यात आली आहे. बावकर यांचे समाजकार्य मोठे आहे. लोकांच्या वेळेला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ख्याती असल्यामुळे त्यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन व हितचिंतकांकडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा मिळत आहेत.
नवोदित पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येय-धोरणे, महापालिका प्रशासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कृतीशील उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी या निवडीप्रसंगी केले आहे.
















