न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२०) :- महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, विधानपरिषदेचे आमदार मार्गदर्शक शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरूकुलम शाळा येथे पश्चिम महाराष्ट्र रहिवासी संघटना, पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वह्या, बिस्किटे, सॅनिटायझरचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रणजित औटे व पदाधिकारी अमोल पाटील,राजु थोरात, अतुल वर्पे, विनायक जाधव, प्रदिप पांडे, पंकज चोपदार, शिवराज ननवरे, समाधान गिरी, नरेंद्र भोईर, संदीप शिंदे कमलेश सुर्यवंशी,चेतन वाघमारे,गौरव नलगे,मनोज साबळे, राजेंद्र निकम, माऊली जगताप, आय एन मुल्ला, हनुमंत पाटील, निखिल दळवी, प्रतिक साळुंखे, जयसिंग चव्हाण, प्रकाश अदानी, प्रतिक औटे, सचिन पवार, संजय साळवे,भागिनाथ शेजवळ,किरण जाधव, परमेश्वर पाटील, देवेंद्र पाटील,मोतीलाल पाटील, शिवाजी पाटील, अरुण भावेकर मित्र परिवार उपस्थित होते.
















