न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ डिसें) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या च-होली, वडमुखवाडी, रावेत आणि पुनावळेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत ये-जा करण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार या शाळांसाठी विद्यार्थी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव गुरूवार (दि. ६ ) रोजी शिक्षण समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता.
शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. हा प्रस्ताव खर्चीक बाबीचा असल्यामुळे तो मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. स्थायीच्या मंजुरीनंतर प्रवासी सुविधेचा खर्च शाळांसाठी प्राप्त होणार आहे. या प्रस्तावास शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
यात च-होलीतील पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, वडमुखवाडीमधील मनपाची प्राथमिक शाळा, रावेत येथील बबनराव भोंडवे प्राथमिक शाळा व पुनावळे येथील प्राथमिक शाळांचा समावेश असणार आहे. यासाठी नगरसेविका सुवर्णा बुर्डे, विनया तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका संगिता भोंडवे, रेखा दर्शले आदींनी यासाठी प्रयत्न केले आहेत.