- पिं. चिं. शहरात आज १७२ जणांना कोरोनाची बाधा तर, ०८ जणांचा मृत्यु; १८४ जणांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. २४ ऑक्टोबर) रोजी १७२ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील आणि हद्दीबाहेरील अशा ०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १८४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले ०४ पुरुष रुग्ण हे चिखली (७९ वर्षे), चिंचवड (३७ वर्ष), पिंपरी (४८ वर्षे), मोशी (५८ वर्षे), ०२दोन स्त्रिया ताथवडे (६८ वर्षे), भोसरी (७१ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष खोदड, पुणे (७३ वर्षे), चर्तुशृंगी (५२ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिम (दुसरा टप्पा) अंतर्गत आज अखेर १३१४ पथकांद्वारे २०१८८८७ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये ४९११ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता १६४ व्यक्ती कोविड पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८६६३६ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८२८९९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५०८ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.
पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिं.चिं. म. न. पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता यावी. यासाठी किमान एक तरी अतिरिक्त (Extra) मास्क जवळ बाळगावा.












