- हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट व बारसुद्धा रात्री ११.३०. वाजेपर्यंत राहणार खुली..
- वाचा सविस्तर नियमावली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांनी व्यायामशाळा (जिम) सुरु ठेवण्यास रविवारी (दि. २५) पासून काही अटींसह परवानगी दिली आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, फूडकोर्ट, रेस्टॉरंट व बार हे सुद्धा ५०% क्षमतेनुसार सकाळी आठ ते रात्री ११.३०. वाजेपर्यंत खुली ठेवण्यास निर्गमित केलेल्या संदर्भ. ४ चे मार्गदर्शक सुचना / अटीनुसार परवानगी दिली आहे.
जिमसाठी सर्वसाधारण अनिवार्य सूचना….
१ कोविड १९ चा धोका कमी करण्यासाठी व्यायामादरम्यान मास्कचा वापर प्रत्येक वेळी अनिवार्य आहे.
२. व्यायामशाळेत व्यायाम करताना एन ९५ मास्क वापरामुळे श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे सर्जिकल मास्क किंवा मल्टी लेअर कापडाचे मास्क, घट्ट विणलेल्या कापसाचे मास्क जे सुरक्षितपणे नाक, तोंड आणि हनुवटी या भागावर घट्टपणे बसतील अशा मास्कचा समावेश करावा. व्यायाम करताना सिंगल लेयर कपड्याचे मुखपट्टी / मास्क देखील वापरू शकतात.
३. जरी हात खराब झालेले नसतील तरीही साबणाने ( किमान ४०-६० सेकंद ) वारंवार हात धुणे आणि २० सेंकदापर्यंत अल्कोहोल – आधारित हँड सॅनिटायझर्सचा वापरणे हे शक्य असेत तेव्हा करावे.
४. खोकताना / शिंकताना रूमाल, टिश्यू पेपर इ. चा वापर तोंड झाकण्यासाठी न चुकता करावा, तसेच खोकताना किंवा शिंकताना हाताच्या कोपराचा वापर करावा व रूमाल, टिश्यू पेपर यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी.
५. आरोग्याचे स्व-परीक्षण करणे आणि कोणत्याही आजाराची नोंद महापालिकेच्या हेल्पलाईनला कळविणे.
६. परिसरात थुकण्यास कडक मनाई करणेत यावे.
७. आरोग्य सेतु अॅप वापरण्याबाबत सर्वांना सल्ला देण्यात यावा.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाय….
१. कटेन्टमेंट झोनमधील सर्व व्यायामशाळा वापरासाठी बंद राहतील. फक्त कंटेन्टमेट झोन बाहेरील व्यायामशाळा उघडण्यास अनुमती राहील.
२. महानगरपालिका, राज्य सरकार यांनी वेळोवेळी प्रसिध्द केलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वाचे एसओपी अधिसूचनांचे पालन व्यायामशाळांनी केले पाहिजे.
३. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्ती, ज्या व्यक्तींना जुने दुर्धर आजार (कोमॅबिडीटीज) आहेत, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुलांना बंधिस्त व्यायामशाळेचा वापर करता येणार नाही, व्यायामशाळा चालकांनी त्याबाबत सर्व सभासद, कर्मचारी इ.ना सुचना द्याव्यात.
विशिष्ट उपाययोजना…
व्यायामशाळा उघडण्यापूर्वी व्यायामशाळा परिसर व प्रक्रिया, उपकरणे यांची पुनर्रचना करणे….
१. प्रती व्यक्ती ४ वर्ग मीटर आधारीत व्यायामशाळा क्षेत्राचे नियोजन करावे.
२. कमीतकमी ६ फूट अंतरावर व्यायामशाळा उपकरणांचे मांडणी करावी. शारीरिक व्यायामामुळे श्वास बाहेर टाकण्याचे प्रमाण आणि तीव्रता वाढू शकते त्यामुळे विषाणूचे संक्रमण होण्याचाधोका कमी करण्यासाठी शारिरीक अंतर ठेवणे खुप महत्वाचे आहे. व्यायाम करताना जेथे श्वाच्छोवास तीव्रतेने होणार आहे अशा व्यक्तींमध्ये किमान १२ फूट अंतर राखणे आवश्यक आहे. तसेच जेथे श्वासोच्छोवासाची तीव्रता कमी आहे तेथे किमान ६ फुट अंतर राखावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा शाररिक अंतर वाढवावे, अधिक अंतर राखण्यासाठी ” एक्स ” पॅटर्न प्रमाणे उपकरणांची पुनर्रचना करावी.
३. जेथे शक्य असेल तेथे बाहेरील जागा उपकरणे पुनर्रचना करण्यासाठी वापरावी.
४. व्यायाम क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी विशिष्ट मार्ग तयार करा. त्याबाबत जमिनीवर किंवा भिंतीवर खुणाचा वापर करावा.
५. व्यायामशाळेत आत आणि बाहेर जाणेसाठी रांग व्यवस्थापन सुनिश्चित करावे व ६ फूट अंतर असलेल्या खुणा कराव्यात.
६. कार्ड आधारित / कॉन्टॅक्टलेस पेमेंटचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करावे.
७. वातानुकूलन / वेंटिलेशनसाठी सीपीडब्ल्यूडीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. सर्व वातानुकूलन उपकरणांची तापमान ठेवन २४-३० ‘ से. असणे आवश्यक आहे व सापेक्ष आर्द्रता ४०-७० % च्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. परिसरात ताजी हवा जितकी शक्य तितकी खेळती राहील व शक्य असल्यास क्रॉस वेंटिलेशन पुरेसे राहील याची दक्षता घ्यावी .
८. व्यायामशाळा परिसरात कर्मचारी आणि सदस्याची संख्या मर्यादित करावी. विशिष्ट वर्कआउट क्षेत्रे आणि खोल्यालागत पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. अ. निर्दिष्ट भागात परवानगी असलेल्या सदस्यांची संख्या प्रतिबंधित करणे. .
ब. विशिष्ट व्यायामासाठी ” फिटनेस सेशन्स ” स्लॉट नोंदणी पध्दत वापरावी आणि या करिता ऑनलाईन नोंदणी प्रणालीचा वापर करावा.
९. सामाजिक अंतर कायम राखून लॉकर रूम्सचा वापर करता येईल.
१० डस्टबिन आणि कचरापेटी नेहमीच झाकल्याची खात्री करावी.
११. स्पा, सौना, स्टीम बाथ आणि जलतरण तलाव (जेथे लागू असेल तेथे) बंद राहतील.
निर्जंतुकीकरण…..
वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित जतुनाशकांचा वापर करून व्यायामशाळा परिसराचा सर्व भागाचे निर्जंतुकीकरण करावे. प्राधान्याने निर्जंतुकीकरण करण्याचे, क्षेत्र याव्यतिरिक्त व्यक्तींचा स्पर्श, संपर्क येऊ शकणा-या सर्व भागाचे निर्जतूकिकरण करावे.
१. प्रवेशद्वार इमारत खोल्या
२. कर्मचारी आणि अभ्यागत यांनी वापरलेली सर्व खुली क्षेत्रे
३. वॉशरूम आणि शौचालये
४. शू बाथ ( सदस्यांना स्वतंत्र कसरत शूज वापरण्यास प्रोत्साहित केले जाईल)
५. इतर सर्व वारंवार स्पर्श केलेल्या पृष्ठभाग (हँडल्स इ.)
६. व्यायामशाळांमधील उपकरणे
व्यायामपध्दती वापराचे नियोजन आणि वेळापत्रक….
१. प्रति सत्र जास्तीत जास्त क्षमतेची गणना करून सत्राची आखणी करावी व त्यानुसार त्यानुसार सत्राचे वेळापत्रक तयार करून सदस्यांना माहिती द्यावी.
२. ग्रुप फिटनेस रूम आणि वर्ग
अ. सदस्यांचे आगमन आणि निघणे दरम्यान ओव्हरलप टाळण्यासाठी सर्ववर्ग सत्र वेळा दरम्यान किमान 15-30 मिनिटे अंतर आवश्यक आहे.
ब. शक्य असेल तेथे ग्रुप फिटनेस क्लासेस ऑनलाईन घ्यावे.
क. व्यायामक्षेत्र, रूम चे आकारानुसार प्रति ग्रुप फिटनेस वर्गास परवानगी असलेल्या व्यक्तींची संख्या प्रतिबंधित करणे
व्यायामशाळांमधील वैयक्तिक प्रशिक्षण ….
१. वैयक्तिक प्रशिक्षणादरम्यान वैयक्तिक प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यात ६ फूट अंतर सुनिश्चित करावे
२. व्यायामशाळा प्रशिक्षक व सभासद यांच्यामध्ये शारीरिक अंतर ठेऊन उपकरणाचे व्यवस्थापन करावे.
३ प्रति सत्र ग्राहकांची संख्या मर्यादित करा आणिसर्व ग्राहकामध्ये पुरेसे अंतर सुनिश्चित करा.
४ जेथे जेथे शक्य आहे तेथे ब्यायामक्षेत्राबाहेरील उपलब्ध जागेचा वापर करावा.
व्यायामशाळा कर्मचाऱ्यासाठी…….
१ सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी शिफ्ट आणि उपस्थितीचे नियोजिन करावे.
२. कंटेन्टमेंट झोनमध्ये रहात असलेले कर्मचारी हे कंटेन्टमेंट झोन निरस्त होईपर्यंत उपस्थित राहणार नाहीत.
३. साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कचरा व्यवस्थापनाच्या मानदंडाविषयी माहिती व प्रशिक्षण देण्यात यावे.
४. जास्त जोखीम असलेले सर्व कर्मचारी उदा. वृद्ध कर्मचारी, गर्भवती कर्मचारी तसेच ज्यांना काही वैद्यकीय आजार आहेत या सर्वांनी जास्त सावधगिरी बाळगावी व शक्यतो त्यांचा ग्राहकांशी थेट संपर्क होणार नाही हे पहावे.
सरक्षा साधनांची उपलब्धता आणि पुरवठा व्यवस्थापन…….
१ वैयक्तिक संरक्षण करण्यासाठी मास्क / मुखवटे हँड सॅनिटायझर्स इ.सभासद, अभ्यागत आणि कर्मचा-यांना व्यवस्थापनाद्वारे उपलब्ध करुन देण्यात यावे.
२. जंतुनाशक साधने डिस्पोजेबल टॉवेल इ.चा पुरेसा पुरवठा सभासद, कर्मचा-यांसाठी करावा व उपकरणांचा उपयोग करण्यापूर्वी आणि नंतर व्यायाम उपकरणे पुसण्याची व्यवस्था करावी.
३. सभासदांना व्यायाम करण्यापुर्वी ऑक्सिजन ची नोंद करण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
व्यायामशाळा उघडल्यानंतर…
प्रवेशद्वार….
१. प्रवेशद्वारावर थर्मल स्किनिंग व हँण्ड सॅनिटायझ करणे बंधनकारक आहे.
२. फक्त लक्षणे नसणा-या व्यक्तींना (कर्मचाऱ्यासह) आवारात परवानगी राहील.
३ मुखपट्टी / मास्क वापरणा-या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा.
४. सर्व सदस्य, अभ्यागत आणि कर्मचारी यांनी आरोग्य सेतू अॅप वापरणे आवश्यक आहे.
५. कोविड १९ विषयी प्रतिबंधात्मक उपायांवर पोस्टर्स स्टडिज इ. स्पष्टपणे दिसेल अशा ठिकाणी लावाव्यात.
६. कोविड १९ च्या प्रतिबंधक उपायावर जागरूकता पसरविण्यासाठी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स चा वापर करावा
७. रांगेत किमान ६ फूट अंतर सुनिश्चित करने
८. पार्किंग लॉटमध्ये, कॉरिडॉरमध्ये आणि लिफ्टमध्ये योग्य पद्धतीने गर्दीचे व्यवस्थापन करावे.
९. व्यायामासाठी परवानगी देण्यासाठी स्वतंत्र टायमिंग स्लॉटसह सदस्य / अभ्यागत यांचे वेळ निश्चित करणे. आवार आणि उपकरणांचे पुरेसे शारीरिक अंतर आणि निर्जतुकीकरण करणे.
१०. सभासद आणि अभ्यागतांच्या चेक इन आणि चेकआउट वेळेचा तपशील नोंदविला जाणे आवश्यक आहे (नाव, पत्ता आणि फोन नंबर)
कार्डिओ, प्रशिक्षण इत्यादी उपकरणे वापरून व्यायामशाळेत व्यायाम करण्यापूर्वी….
१. उपकरणे निर्जंतुकीकरण केली असल्याचे सुनिश्चित करा विशेषतः वारंवार स्पर्श केला गेलेल्या पृष्ठभागाचे प्रत्येक वापरापूर्वीचा निर्जतूकिकरण करणे आवश्यक आहे.
२. हाताचे मधले बोट सेनिटायझर वापरून स्वच्छ करून ऑक्सिजन पातळी तपासणे व ऑक्सिमीटर वर ज्याची ९५% पेक्षा कमी ऑक्सिजन आहे त्यांना व्यायामाची परवानगी दिली जाऊ नये व त्यांची माहिती महानगरपालिका हेल्पलाइनला देणे आणि अशा व्यक्तींना जवळच्या आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात यावे.
३. प्रत्येक व्यायामशाळा उपकरणाजवळ हँडसनिटायझर ठेवणे आवश्यक आहे.
४. जिम्नॅशियम उपकरणे वापरण्यापूर्वी सदस्यांनी त्यांचे हात स्वच्छ केले असल्याचे सुनिश्चित करा
व्यायामाच्या सत्रांमध्ये….
१. सामान्य व्यायाम करताना सार्वजनिक मॅटचा वापर टाळला पाहिजे आणि सदस्यांनी व्यायामासाठी शक्यतो स्वतःचे मॅट आणावे व व्यायाम झाल्यानंतर ते त्यांच्याबरोबर परत घेऊन जातील.
२. संक्रमणाचा प्रसार होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता शक्य तेथे संगीत / गाणी यांचा वापर केला जाऊ शकतो. तथापी ओरडणे हास्य, योग व्यायामास अनुमती दिली जाऊ नये.
३. सभासदाला वास घेण्यात त्रास होत असेल तर व्यायाम थाबवावा. ऑक्सिजन पातळी तपासावी व ती ९५ %, पेक्षा कमी असल्यास व्यायाम चालू ठेवू नये व अशा व्यक्तींना जवळच्या आरोग्य सुविधेकडे पाठवावे.
व्यायामानंतर परिसरात…….
१. चेहरा कव्हर्स मास्क वापरलेल्या टॉवेल्स यांची कचरा पेटीमध्ये योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
२. शॉवर क्षेत्रे / वॉशरूम वापरण्यापूर्वी आणि नंतर स्वच्छ केले पाहिजेत.
३. जिम्नॅशियम उपकरणाची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण विशेषत: वारंवार पृष्ठभागास स्पर्श करतात (हँड रेल, बेंच, फिक्स्चर इ.) प्रत्येक व्यायाम सत्रानंतर येण्यापूर्वी केले पाहिजे.
४. मजल्याची साफसफाई दोन व्यायाम सत्रादरम्यान केली जाईल.
जिम बंद करताना……
१. शॉवर रुम आणि लॉकर बदलणारे क्षेत्र योग्यरित्या स्वच्छ केले जाणे आवश्यक आहे.
२. सर्व वाशरूमची संपूर्ण साफसफाई केली जाईल.
बंद होण्यापूर्वी संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण होईल याची दक्षता प्यावी.
परिसरामध्ये संशयित व्यक्ति आढळल्यास घ्यावयाची अतिरिक्त सावधगिरी…….
१. आजारी व्यक्तीला एखाद्या खोलीत किंवा क्षेत्रात ठेवा जेथे ते इतरांपासून दूर राहतील.
२. डॉक्टर तपासणी करेपर्यंत मास्क उपलब्ध करून द्यावा.
३. तातडीने याबाबत जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा हेल्पलाइनला कळविण्यात यावे.
४. परिसरामध्ये एखादी व्यक्ती सकारात्मक आढळल्यास परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.
कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी निर्गीमित करणेत आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारा व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहितचे कलम १८८ अन्वये दंडनिय अपराध केला असे समजून कारवाईस पात्र राहील. हा आदेश दि. २५/१०/२०२० पासून पुढील आदेश येईपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात लागू राहतील.












