न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील पाणी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे आदी उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. तसेच नद्यांचे होणारे प्रदूषण या विषयीही चर्चा करण्यात आली.
नदी प्रदूषण रोखण्यासाठी मल:निसारण प्रकल्प राबविण्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच शहर परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई याविषयी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. पाणीपुरवठा योजनासाठीचे १०० कोटींचे विषय स्थायी समितीसमोर आहेत. यावरही चर्चा झाली.
महापालिका परिसरातील व कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. १९ पैकी १६ कोविड सेंटर बंद केले आहेत. महापालिकेच्या वतीने लवकरच पोस्ट कोविड तपासणी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. तसेच वायसीएम रुग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे.
कोविडच्या काळात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करु नयेत, असे निर्देश आहेत. निर्बंध उठविल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्रावण हर्डीकर म्हणाले.
लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी आहे. भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून पाणी आणण्याचे नियोजन सुरू आहे. महापालिका सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता १०० एमएलडीने वाढविण्यासाठीचे काम सुरू आहे. त्यामुळे अधिकचे पाणी उपलब्ध होईल. २४ तास पाणी पुरवठा योजनेतील ४० टक्के पाणी योजना काम ८० टक्के झाले आहे, तर ६० टक्के योजनेचे काम ६० टक्के झाले आहे.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त…


















