- कोरोना व त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांना सदस्य वैतागले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- कोरोनाच्या कालखंडात स्थायी समितीत कोरोनावर चर्चा करणे अपेक्षित असताना सभेत ‘ नवीन कामे आणा ‘ , अशा सूचना सदस्यांनी प्रशासनास केली. त्यामुळे स्थायीला कोरोनापेक्षा विकासकामांतून टक्केवारीची चिंता असल्याचे दिसून येत आहे.
शहरात कोरोनाची रुग्णसंख्या ८५ हजारांवर पोहोचली आहे. महापालिका स्थायी समिती सभेच्या विषय पत्रावर ३६ विषय होते. मात्र, सांगवीतील नदीवरील पुलासाठी पुणे महापालिकेस निधी देण्याचा विषय वगळता कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही.
फेब्रुवारीत नवीन स्थायी समितीचे सदस्य निवडल्यानंतर गेल्या आठ महिन्यांत कोविड आणि पाणीपुरवठा, आरोग्य आणि जलनिस्सारणाची कामे वगळता कोणतेही नवीन प्रकल्प राबविलेले नाहीत. त्यामुळे स्थायी समितीचे टार्गेट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सदस्य अस्वस्थ आहेत.


















