- परवानगी नसणाऱ्या दुकानांकडून आकारणार शास्तीकर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- खासगी मालमत्तांवर रस्त्यांच्या दुतर्फा बाजूला अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सर्व दुकानांचे सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
या दुकानांची नोंद करसंकलन विभागात करून शास्तीसह या दुकानमालकांकडून कराची वसूली केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी दिली.
महापालिका हद्दीत नव्याने विकसित होणाऱ्या अनेक भागांत विशेषतः मोशी, चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, तळवडे, रावेतसह अनेक ठिकाणी दुकानांचे सर्वेक्षण केले जाणार असून त्याच्या नोंदी करसंकलन विभागामार्फत घेतल्या जाणार आहेत. ज्या दुकानांना परवानगी नसेल त्या दुकानांना शास्तीकर आकारून नोंद केली जाणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजारोत भर पडेल, असा विश्वासही आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला.


















