न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) रोजी १७३ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी चिंचवड हद्दीतील ०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ३१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण ३ पुरुष रुग्ण हे काळेवाडी (६० वर्षे), पिंपरी (६९ वर्षे), दिघी (८३ वर्षे) येथील रहिवासी आहेत.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८७४३३ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८४१२५ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १५२६ जणांचा मृत्यू झालेला आहे. पालिकेने शहरातील कोरोनाने प्रभावित झालेल्या व मुक्त झालेल्या रुग्णांच्या परिसराची माहिती दिलेली नाही.












