न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२०) :- करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आज लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, ‘मिशन बिगिन अगेन’तंर्गत सुरू केलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत.
राज्यातील अनेक सेवा व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन व करोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे.
राज्य सरकारनं सप्टेंबरमध्ये मुंबईतील लोकल सेवेसह राज्यातंर्गत रेल्वे सुरू करण्यास परवानगी देत लॉकडाउन ३० ऑक्टोबरपर्यंत वाढवला होता. आता ऑक्टोबरमध्ये त्यांची मुदत संपल्यानं पुन्हा एकदा ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाउनची मुदत वाढवली आहे. लॉकडाउनची मुदत वाढवताना मिशन बिगिन अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील असं सरकारनं म्हटलं आहे.












