न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याकडील कोरोनाचे कामकाज, वैद्यकीय मुख्य कार्यालय, रुग्णालये, खरेदी, धन्वंतरी स्वास्थ्य योजना, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक आदीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत.
ही जबाबदारी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. डॉ. साळवे यांच्याबाबत अनेक तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे बदल केल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. साळवे यांच्याकडे सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचे कामकाज, आरसीएच, एनयुएचएम, पीसीपीएनडीटी, आरएनटीसीपी विषयक कामकाज, जन्म – मृत्यू व विवाह विषयक कामकाज ठेवण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या नियंत्रणाखाली डॉ. गोफणे काम करणार आहेत.