न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२०) :- मोशी येथील खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. हे काम संपत आले असताना आता पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने बंदिस्त प्रदर्शन केंद्रांचे काम हाती घेतले आहे. केद्रांतर्गत दोन हॉल उभारण्यात येणार आहे.
प्राधिकरणाकडून मोशी येथील पेठ क्रमांक ५ व ८ येथील जागेत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन केंद्र उभारण्याचे नियोजित आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात २० हेक्टर जागेत खुले प्रदर्शन केंद्र उभारले जात आहे. त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
प्रदर्शन केद्रांच्या जागेत ३ प्रदर्शन हॉल उभारणीचे नियोजन होते. प्रत्येक हॉल अंदाजे ३५ हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्राचा नियोजित होता. उर्वरित जागा खुली ठेवण्यात येणार आहे . त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहे. त्याबाबत ई – निविदा मागविल्या आहेत. सल्लागार नियुक्तीनंतर विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. तसेच, निविदा काढून कार्यादेश दिला जाणार आहे.